• Wadi Chauk, Amalner
  • 02587226711

बुकिंग धोरण (Booking Policy)

श्री सदगुरु सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थान, अमळनेर
संचलित – श्री सदगुरु गोविंद महाराज भक्त निवास


1. बुकिंग प्रक्रिया:

  • भक्त निवासात राहण्यासाठी पूर्व बुकिंग अनिवार्य आहे.

  • बुकिंग करताना राहणाऱ्या सर्व व्यक्तींचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आणि वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सादर करणे आवश्यक आहे.

  • बुकिंग केवळ संस्थेच्या अधिकृत माध्यमातून (ऑफिस, वेबसाइट, किंवा मान्य प्रतिनिधीमार्फत) स्वीकारली जाईल.


2. पेमेंट आणि रद्द करणे:

  • एकदा केलेले बुकिंग कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही.

  • शुल्क परत मिळणार नाही, किंवा बुकिंग पुढे ढकलता येणार नाही.

  • रूम बदलण्याचा अधिकार केवळ व्यवस्थापनाकडे राखीव आहे.


3. चेक-इन आणि चेक-आउट वेळा:

  • चेक-इन: सकाळी 10:00 वाजल्यापासून

  • चेक-आउट: दुपारी 12:00 वाजेपर्यंत

  • नियोजित वेळेपूर्वी किंवा नंतर येणाऱ्या अतिथींनी पूर्वकल्पना द्यावी.


4. राहण्याची कालमर्यादा:

  • भक्त निवासामध्ये राहण्याचा कालावधी कमाल 3 दिवसांचा असेल.

  • अधिक दिवस राहण्याची गरज असल्यास व्यवस्थापनाची आगाऊ परवानगी आवश्यक आहे.


5. नियमांचे पालन:

  • सर्व रहिवाशांनी भक्त निवासाची नियमावली काटेकोरपणे पाळावी.

  • कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, नियमभंग अथवा धार्मिक वातावरण बिघडवणारे आचरण आढळल्यास व्यवस्थापन रूम रद्द करण्याचा किंवा तत्काळ बाहेर काढण्याचा अधिकार राखून ठेवते.


6. इतर महत्त्वाच्या अटी:

  • फक्त शाकाहारी भोजनास अनुमती आहे.

  • धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थ यांस सक्त मनाई आहे.

  • रूममधील कोणत्याही वस्तूंचे नुकसान झाल्यास भरपाई घ्यावी लागेल.

  • मौल्यवान वस्तूंची काळजी स्वत: घ्यावी. संस्थान जबाबदार राहणार नाही.


स्वीकृती:

मी/आम्ही वर दिलेले सर्व नियम, अटी व धोरणे वाचून समजून घेतली असून ती आमच्या संपूर्ण सहमतीने मान्य करतो/करतो.

Confirm Cancel
Edit